अभ्युदय एज्युकेशन सोसायटीची मराठी प्राथमिक शाळा
इयत्ता १ ली वर्गाकरिता नवीन प्रवेश सुरु २०२6 - २०२7
- नवीन शैक्षणिक वर्ष २०२6-२7 वर्षाकरीता मराठी प्राथमिक वर्गांकरिता गुरुवार दि.०१ जानेवारी २०२६ पासून प्रवेश सुरु होत असून प्रवेश अर्जासाठी पालकांनी खालील लिंक वापरुन प्रवेश अर्ज भरावा आणि त्याची प्रिंटआउट काढून मराठी प्राथमिक कार्यालयात जमा करावी व प्रवेश निश्चित करावा .
- प्रवेशाबाबत काही अडचण असल्यास मराठी प्राथमिक विभाग कार्यालयामध्ये चौकशी करावी.
https://www.aesoc.in/mar1admissions
Edit / Re-print your Admission Form or Check your Admission Status.
(DO NOT FILL A NEW FORM IF YOU HAVE MADE SOME MISTAKES USE THE EDIT LINK )
( जर फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील तर नवीन फॉर्म भरू नका Edit लिंक चा वापर करा . )
- प्रवेश अर्जाची प्रिंटआउट व खालील कागदपत्रांसह १२ pm. ते ४ pm या वेळेत दुसर्या मजल्यावरील प्राथमिक कार्यालयात सादर करा.
- प्रवेश अर्ज जर मोबाईल वरुन भरणार असाल तर कीबोर्ड ची सेटिंग English मध्येच असायला पाहिजे.
- प्रवेश अर्ज प्राथमिक कार्यालयात जमा करताना खालील कागद पत्र सोबत शालेय वार्षिक फी आणावी .
- विद्यार्थ्याच्या जन्म प्रमाणपत्राची मूळ प्रत.
- विद्यार्थ्याच्या आधा र कार्डाची झेरॉक्स प्रत.
- आई व वडिलांचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत.
- (मागासवर्गीस असल्यास जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स आवश्यक)
- प्रवेश अर्ज शुल्क रु. ५०.
प्रवेशासाठी आवश्यक जन्मतारीख आणि वय खालीलप्रमाणे:
| वर्ग |
जन्मतारीख |
वय
|
| इयत्ता १ ली |
१ जानेवारी २०२0 ते ३१ डिसेंबर २०२0 |
६ वर्ष |
शालेय संगणक फी : रु. ६००/-
व दैनंदिनी, आयडी कार्ड, शालेय वार्षिक समारंभ (Means Schools Activities) : रू.४००/-
एकूण रु.१०००/-
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Q.R. Code चा वापर करा.